सोलरपॅनल शिवायच मिळणार सौर उर्जा

tesla
उर्जेसाठी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसविण्याचे झेंगट आता कमी होणार असून घरासाठी सौर उर्जा मिळविताना आता सोलर पॅनलची गरज संपुष्टात येणार आहे. सोलर टाईल्स बनविणार्‍या टेस्लाने घरांसाठीच्या छतांमध्येच सोलर टाईल्स बसविण्याचे तंत्र विकसित केले असून त्यामुळे घराची विजेची पूर्ण गरज भागविता येणे शक्य होणार आहे.

टेस्लाचे सीईओ एलन मस्क या संदर्भात माहिती देताना म्हणाले की कंपनीने काचेच्या टाईल्स बाजारात आणल्या आहेत व त्या अनेक रंगात व स्टाईलमध्ये उपलब्ध आहेत. या टाईल्समुळे सोलर पॅनलचे काम केले जाते व त्यासाठी येणारा खर्चही परंपरागत छत व त्यावर बसवाव्या लागणार्‍या सोलर पॅनल्सपेक्षा कमी आहे. कंपनीने होम पॉवर बॅटरी वॉलही सादर केली आहे. या वॉलमध्ये जादाची सोलर उर्जा साठविण्याची क्षमता आहे. या वॉलची किंमत ५५०० डॉलर्स आहे. काचेच्या छताच्या टाईल्सच्या किमती मात्र अजून जाहीर केल्या गेलेल्या नाहीत.

Leave a Comment