एलजीचा व्ही २० स्मार्टफोन लवकरच भारतात

lgv20
अँड्राईड नगेट सेव्हनचा वापर करण्यात आलेला जगातला पहिला स्मार्टफोन अशी ओळख मिळविलेला एलजीचा व्ही २० स्मार्टफोन लवकरच भारतात येत असल्याचे समजते. हा फोन किती तारखेला भारतात लाँच होईल याची नक्की माहिती मिळालेली नाही मात्र त्याची भारतातील किंमत ४९९९० रूपये असेल असे खात्रीलायक वृत्त आहे. हा फोन सॅनफ्रान्सिस्को मध्ये कंपनीने सप्टेंबर महिन्यात लाँच केल्यानंतर त्याच्या भारतातील लॉचिंगबाबत चर्चा सुरू झाली होती.

या फोनसाठी ५.७ इंची आयपीएस क्वांटम डिस्प्ले सेकंडरी डिस्प्लेसह दिला गेला आहे. ३२ जीबी व ६४ जीबी अशा दोन व्हर्जनमध्ये तो उपलब्ध असून त्याची मेमरी मायक्रोकार्डच्या सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे.४ जीबी रॅम व ड्युअल कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनला १६ एमपीचा कॅमेरा १३५ डिग्री वाईड लेन्ससह असलेल्या ८ एमपीच्या सेन्सरसह दिला गेला आहे. फ्रंट कॅमेरा ५ एमपीचा आहे. या फोनसाठी ऑटोशॉट फिचर दिले गेले आहे. म्हणजे युजरचे स्माईल ओळखून तो सेल्फीफोटो काढू शकतो. या फोनची बॉडी अे एट ६०१३ मेटलपासून बनविली गेली आहे. हे मेटल विमाने, सेलबोटी, माऊंटन बाईक साठी वापरले जाते.

अँड्राईड ७.० नगेटसह असलेल्या या फोनला गुगलचे इन अॅप सर्च फंक्शनही दिले गेले आहे. याच्या मदतीने युजर कोणत्याही गुगल अॅपवर कॉन्टॅक्ट, ईमेल,टेक्स्ट मेसेज, फोटो सर्च करू शकेल. मल्टी विंडोज सुविधेमुळे युजरला दोन अॅप एकत्र चालविणेही शक्य होणार आहे.टायटन सिल्व्हर व पिक कलरमध्ये तो उपलब्ध होईल.

Leave a Comment