वाइन अॅप बंद करणार ट्विटर

twitter
मॉस्को : ट्विटर कंपनी सातत्याने तोटय़ात असून हळूहळू आपल्या शाखा बंद करण्याची तयारी करत आहे. भारतातून अनेक कर्मचा-यांची अलिकडेच कंपनीने कपात केली होती. आता ट्विटरने व्हिडिओ शेअरिंग मोबाइल अॅप ‘वाइन’ बंद करण्याची घोषणा केली आहे. हे अत्यंत लोकप्रिय अॅप असल्याने या वृत्तामुळे अनेक जण निराश होतील. मोबाइलमधून वाइन अॅप संपुष्टात आल्यानंतर देखील याची वेबसाइट सुरूच राहिल. परंतु ते कायमस्वरुपी नसून काही दिवसांसाठी असणार आहे. याद्वारे युजर्स तेथून कोणतीही चित्रफित डाउनलोड करू शकतील असे ट्विटरने स्पष्ट केले. पुढील महिन्यात हा अॅप बंद होईल, परंतु त्याची नेमकी तारीख कंपनीने स्पष्ट केली नाही. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने 2013 मध्ये वाइनची सुरुवात केली होती, ज्यात छोटय़ा आकाराच्या चित्रफिती शेअर केल्या जातात. हे अॅप लोकप्रिय देखील झाले आणि यानंतर कंपनीने व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप पेरीस्कोप सादर केले होते.

Leave a Comment