अॅमेझॉनची झाली ‘वेस्टलँड’

amazon
मुंबई – अॅमेझॉनकडून टाटा समुहाची मालकी असणा-या वेस्टलँड या प्रकाशन कंपनीची खरेदी करण्यात आली असून दरम्यान या दोन कंपन्यांतील व्यवहार किती रुपयांना झाला याची आकडेवारी प्रकाशित करण्यात आलेली नाही. भारतातील फिजिकल आणि डिजिटल बुक क्षेत्रातील आपली हिस्सेदारी या प्रकाशन कंपनीची खरेदी करण्यात आल्याने वाढेल असा विश्वास अॅमेझॉनने व्यक्त केला. या वर्षाच्या प्रारंभी अॅमेझॉनने या कंपनीतील २६ टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. गेल्या ५० वर्षांपासून ही कंपनी पुस्तकांच्या वितरण, प्रकाशन आणि किरकोळ क्षेत्रात आहे. मद्रास येथील इस्टवेस्ट बुक्स आणि वेस्टलँड बुक्स या कंपनीचे विलीनीकरण होत ही कंपनी स्थापन करण्यात आली होती.

Leave a Comment