इस्रो एकाच वेळी करणार ८३ उपग्रहांचे प्रक्षेपण

isro
चेन्नई – आता जागतिक इतिहास भारतीय अवकाश संशोधन केंद्र इस्रो रचणार असून इस्रो एकाच वेळी ८३ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे, तेसुध्दा एकाच रॅाकेटद्वारे. यामध्ये २ भारतीय आणि ८१ उपग्रह हे विदेशी आहेत. इस्रो २०१७ मध्ये ही कामगिरी करणार असून यासाठी ५०० कोटी खर्च आला आहे असून प्रेक्षपणावेळी ५०० कोटींचा खर्च येईल.

इस्रोचे अध्यक्ष राकेश शशीभुशन म्हणाले की, २०१७ पर्यंत एकाच रॅाकेटद्वारे ८३ उपग्रह सोडण्याची योजना आखली आहे. यामध्ये विदेशी उपग्रह हे लहान स्वरुपाचे आहेत. प्रक्षेपण करताना सर्वात मोठे आव्हान हे आहे की, प्रक्षेपणावेळी उपग्रह हे स्थिर रहायला हवेत. यासाठी एक्स एल (पीएसएलव्ही-एक्सएल) हे रॅाकेट वापरणार आहोत. शशीभुशन यांनी सांगितले की, सर्व उपग्रह आणि रॅाकेट यांचे मिळून १६०० किलोग्रम वजन आहे.

Leave a Comment