एसटी महामंडळाने आणली ‘३० रुपयांत चहा-नाश्ता’ योजना

breakfast
मुंबई – प्रवाशांची खासगी हॉटेलचालकांकडून होणारी लूट रोखण्यासाठी एसटी महामंडळाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून ‘३० रुपयांत चहा-नाश्ता’ योजना एसटी महामंडळाने आणली आहे. महामंडळाने ही सेवा लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गावरील २२ अधिकृत थांब्यांवर सुरु केली आहे.

ही योजना ऑगस्ट महिन्यापासूनच सुरु करण्यात आली होती, मात्र अनेक प्रवाशांना या योजनेबद्दल माहितीच नव्हती. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर प्रशासनाने वाहकांच्या हस्ते पत्रक देऊन प्रवाशांना या योजनेची माहिती देणे सुरु केले आहे. या योजनेनुसार एसटीच्या प्रवाशांना शिरा, पोहे, उपमा, वडापाव, इडली, मेदूवडा, यांपैकी एक पदार्थ आणि एक कप चहा ३० रुपयांत मिळणार आहे.

Leave a Comment