पाणीपुरीच्या शौकीनांसाठी धक्कादायक बातमी

pani-puri1
ठाणे – सगळ्याच्या तोंडाला पाणीपुरी खाण्याच्या विचाराणे पाणी सुटते. शहरातील प्रत्येक चौकात सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी ही पाणीपुरी सहज आढळून येते. मात्र पाणीपुरी खाणाऱ्या खवय्यांच्या जीवावर पुरी बनवण्याच्या घाणेरड्या पद्धतीमुळे ही उठली असून हे पाणीपुरीवाले पुरीचे पीठ पायाने मळत असल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
pani-puri
सूत्रांकडून या घटनेची मिळालेली माहिती अशी, की अत्यंत घाणेरड्या पद्धतीने कल्याण पूर्वेतील कर्पेवाडी परिसरातील पाणी पूरी बनवण्याच्या कारखान्यात पुरीसाठी पीठ बनवण्यात येते. या पिठावर ४ ते ५ मुले नाचत हे पीठ मळत असताना दिसून आले आहे. इतकेच नव्हे तर बाहेर आल्यानंतर थेट ही मुले पिठावर नाचतात, अशा घाणेरड्या पद्ध्तीने बनवलेले हे पीठ पुरी बनवण्यासाठी वापरले जात असल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांच्या आरोग्यला धोका निर्माण झाला आहे. सर्वसामान्यापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांचा आवडता खाद्य पदार्थ म्हणजे पाणीपुरी, शेवपुरी भेळपुरी. खिशाला परवडणारी, चटपटीत चवीमुळे हे खाद्य पदार्थ खवय्यांची पसंती ठरली आहे.

पाणीपुरी विक्रेता शहरातील प्रत्येक चौकात आढळून येतोच. हे विक्रेते स्वच्छता ठेवत असल्याचा आव आणत असले तरी प्रत्यक्षात मात्र या पदार्थात वापरण्यात येणारी पुरी बनवण्याच्या कारखान्यात पुरीचे पीठ कसे तयार केले जाते, हे उघडकीस आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. कल्याण पूर्वेकडील करपेवाडी परिसरात राहणार एक नागरिक हा पाणीपुरी आणण्यासाठी करपे वाडी परिसरात असलेल्या पुरीच्या कारखान्यात गेला. तेथे गेल्यावर त्याने पाहिलेला प्रकार धक्कादायक होता. अस्वछता असलेल्या या खोलीत ४ ते ५ लहान मुले या पाणीपुरीचे पीठ मळण्यासाठी पिठावर चक्क नाचत होते. स्वच्छतागृहातून आल्यानंतर हात पाय न धुता काही मुले पिठावर नाचताना पाहून तर या नागरीकाच्या पाया खालची जमीन सरकली. विशेष म्हणजे या कारखान्यातून जिल्हयात पुरीचा पुरवठा केला जातो. याबाबत या सजग नागरीकाने अशा प्रकारे नागरिकाच्या जीवाशी खेळणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment