जाहिरातदारांसाठी गुगलचे ‘यू-ट्युब’ सर्वात फायदेशीर

youtube
सॅन फ्रॅन्सिस्को : गुगलची सर्वात लोकप्रिय सेवा यू-ट्यूब व्हिडीओ पाहण्यासाठी सर्वात फायदेशीर सेवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध सर्वेक्षणातून नवीन पिढी टीव्ही पाहण्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यासाठी देत असल्याचे समोर आले आहे.

इंटरनेटच्या प्रसारामुळे नवीन पिढीच्या हातात स्मार्टफोन आला, बातम्या, मनोरंजन आणि संगीताच्या आस्वाद घेण्यासाठी नवीन पिढी स्मार्टफोनचाच आधार घेते, त्यातल्या त्यात सर्वात जास्त नवीन पिढी ही यू-ट्यूबवरच असते. यात सर्वात महत्वाचे म्हणजे, नवीन जाहिरातदारांना आपले प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यू-ट्यूब हे सर्वात प्रभावी वाटत आहे. यू-ट्यूब गरजू लोकांपर्यंत थेट जाहिरात पोहोचवत असल्याने जाहिरातदारांचा कल यू-ट्यूबकडे वाढला आहे.

Leave a Comment