महिंद्राची नवी इलेक्ट्रिक सिटी कार

mahindra
पुणे – महिंद्रा इलेक्ट्रिक या कंपनीकडून ई२ओ प्लस ही नवी इलेक्ट्रिक सिटी स्मार्ट कार दाखल करण्यात आली आहे.

शहरी वाहतुकीतील पूर्णतः नवी संकल्पना स्वीकारण्यासाठी अत्यंत वैशिष्टय़पूर्ण व झीरो एमिशन असलेली ही कार सज्ज झाली आहे. पी ४ प्रकारासाठी या गाडीची किंमत ७.०३ लाख रुपये (एक्स शोरूम पुणे, फेम सवलतीनंतर) इतकी असेल. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर महिंद्राची १४० किमीपर्यंत प्रवास करू शकते आणि प्रति तास ८५ किमी या सर्वोच्च वेगाने धावू शकते. महिंद्रा इलेक्ट्रिकच्या नव्या इलेक्ट्रिक ड्राइव्ह ट्रेन तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेली ही गाडी शहरातील वाहतुकीमध्ये विनासायास चालवता येऊ शकते. टॉल-बॉय डिझाइन आणि ऐसपैस इंटेरियर यामुळे ही कार चार जणांना आरामात बसण्यासाठी आटोपशीर सिटी कार ठरते.

महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू याबाबत बोलताना म्हणाले, आमचा सातत्याने भारतातील एकात्मिक आणि इलेक्ट्रिक वाहतूक सुविधांतील प्रणेती म्हणून विविध श्रेणींमध्ये इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहिला आहे. ई२ओ प्लस दाखल करणे, हा महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहतुकीच्या प्रवासातील महत्त्वाचा क्षण असून, यामुळे आम्ही इलेक्ट्रिक सिटी कार सेग्मेंटच्या मोठय़ा बाजारात प्रवेश करीत आहोत. मार्गाचे नियोजन, कारचे आरोग्य व विविधा सुविधा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य मेळ याद्वारे घालण्यात आला आहे.

1 thought on “महिंद्राची नवी इलेक्ट्रिक सिटी कार”

Leave a Comment