शेर्वलेटची ‘ट्रेलब्लेजर’ झाली स्वस्त

chervolet
मुंबई: एन्जॉय एमपीव्ही कारच्या किंमतीत कपात केल्यानंतर आता शेर्वलेट कार कंपनीने आपल्या ट्रेलब्लेजर एसयूव्हीच्या किंमतीतही मोठी कपात केली असून तब्बल ३.०४ लाखापर्यंत या कारच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. त्यामुळे या कारची किंमत आता २३.९५ लाख झाली आहे.

शेर्वलेटने मागील वर्षी बाजारात ही ट्रेलब्लेजर ही कार आणली होती. तेव्हा या कारची किंमत तब्बल २६.४० लाख होती. सध्या सणासुदीचे दिवस असून ग्राहकांचे चांगल्या ऑफर्सकडे लक्ष असल्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. फोर्डच्या एंडेव्हरशी ट्रेलब्लेजरची स्पर्धा आहे. नुकतेच एंडव्हेरने २.८२ लाख किंमतीत कपात केली होती. त्यामुळे आता ट्रेलब्लेजरच्या किंमतीत कपात करुन शेर्वलेटने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment