आता व्हॉट्सअॅपवरूनही करा व्हिडीओ कॉलिंग

whatsapp
मुंबई- फक्त विंडोज फोनवरच बिटा व्हर्जनवर उपलब्ध असणारे व्हिडीओ कॉलिंग हे नवे फिचर व्हॉट्सअॅपने आता अॅड्रॉईडरवही उपलब्ध केल्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर फक्त मेसेज नाही तर व्हिडीओ कॉलही करु शकतो. व्हॉट्सअॅप युझर्सची संख्या पाहता हे फिचर खूपच उपयोगी पडेल यामध्ये दुमत नाही.

सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेंजर अ‍ॅप आहे. आपल्या युझर्सला नेहमी नवीन नवीन फिचर्स देण्यासाठी सुद्धा व्हॉट्सअ‍ॅप नेहमी पुढे असतो. याच कारणामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्या युझर्सची संख्या वाढतच आहे. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या युझर्सला अजून एक नवीन फिचरची भेट देत व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केले. सुरुवातीला फक्त विंडोज फोनवरच बिटा व्हर्जनवर उपलब्ध असणारं हे फिचर आता अॅड्रॉईड युझर्सनाही उपलब्ध झाले आहे.

मेसेंजिंग अ‍ॅपच्या दुनियेत व्हिडीओ कॉलिंग ही सेवा काही नवीन नाही. स्नॅपचॅट, फेसबुक मेसेंजर, व्हायबर, स्काईप आदी मेसेंजिंग अ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग ही सेवा आधीपासूनच देत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ कॉलिंग फीचर कधी सुरु करतो यावर जगभरातील टेक्नो प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. आता मात्र व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केले आहे.

Leave a Comment