भारतात लॉन्च होणार वेस्पाची सर्वात महागडी स्कूटर

vespa
मुंबई: इटलीची कंपनी पियाजिओने भारतात वेस्पा ९४६ एम्पोरिओ अरमानी एडीशन स्कूटर सादर केली असून ९.२५ लाख रूपये इतकी या स्कूटरची किंमत असून भारतातील सर्वात महागडी ही स्कूटर असणार आहे.

रिपोर्टनुसार, भारतात ही स्कूटर २५ ऑक्टोबरला लॉन्च होणार होती. पण काही कारणास्तव लॉन्चिंगची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या स्कूटरची दिल्लीतील किंमत ९.४० लाख रूपये इतकी आहे. ही स्कूटर इतकी महागडी असण्याचे कारण की, कंपनीने प्रसिद्ध प्रिमिअम फॅशन ब्रॅण्ड एम्पोरिओ अरमानी सोबत करार केला असून ही स्कूटर ज्याद्वारे लक्झरी स्कूटर कॅटेगरीमध्ये येते.

वेस्पा ९४६ मध्ये ट्रेडमार्क अरमानीचे सिग्नेचर दिले गेले आहे. यात ग्रे कलर आणि ग्रीन कलर पॅलेट देण्यात आले आहे. यात सॅटिन फिनीश देण्यात आले आहे. तर हेडलॅम्पवरही अरमानीचा लोगो देण्यात आला आहे. या स्कूटरची सीटही अरमानी एडिशनची आहे. ती भुरक्या कलरच्या रंगात शिवली असून या स्कूटरमध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी इलेक्ट्रॉनिक रायडिंग कंट्रोलसोबतच फ्य़ूअल इंजेक्शन दिले गेले आहे. १२५ सीसीचे ४ स्ट्रोक मोनो सिलेंडर इंजिन वेस्पा ९४६ अरमानी एडिशनमध्ये लावण्यात आले आहे. यात एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी टेल लॅम्प आणि एलसीडी इन्स्ट्रूमेंट पॅनल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि एंटी स्लिप रेग्यूलेटर दिले गेले आहे. यासोबतच यात डबल डिस्क, टू चॅनल एबीएस आणि १२ इंचाचे एलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत.

Leave a Comment