धक्कादायक ! पुण्यात चिकनगुनियाचे ९६ टक्के रुग्ण

chikunguniya
पुणे- अद्यापही डेंग्यू आणि चिकनगुनियाचे शहरात थैमान सुरूच असून चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्याचे असून राज्य आरोग्य विभागाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागामध्ये सर्वाधिक १४६१ म्हणजेच ९६ टक्के रुग्ण चिकनगुनियाग्रस्त झाल्याचे समोर आले आहे.

शनिवारपर्यंत (२२ ऑक्टोबर) राज्यामध्ये १५२० चिकनगुनियाच्या नोंदी झाल्या होत्या. त्यापैकी जिल्ह्यात १४६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी शहरामध्ये सर्वाधिक १२२५, ग्रामीण भागामध्ये २१२ आणि पिंपरी चिंचवडमध्ये २४ रुग्ण आढळले आहेत. चिकनगुनियाच्या तुलनेत राज्यभरात डेंग्यूचे ५१३७ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १६ जणांचा डेंग्यूच्या तापामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्याच्या अहवालामध्ये फक्त सरकारी प्रयोगशाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांच्या नोंदीच यामध्ये विचारात घेण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळा यांच्या तपासण्यांचे निकाल लवकरात लवकर देण्यात येत असल्यामुळे त्या नोंदींचा विचार करण्यात आला नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment