तुमच्या किचनमध्ये लवकरच रिलायन्स इन्डस्ट्रीजचा प्रवेश

reliance
नवी दिल्ली – आता घरगुती सिलिंडरच्या व्यवसायात रिलायन्स इन्डस्ट्रीज उतरली असून ४ किलोग्रॅम वजनाचे कुकिंग गॅस सिलिंडर रिलायन्सने प्रायोगिक पातळीवर सुरू केले आहेत. केवळ चार जिल्हय़ांपुरती ही सेवा मर्यादित असून लवकर वाढविण्यात येईल. एलपीजीच्या मागणीत गेल्या काही वर्षात प्रतिवर्षी १० टक्क्यांनी वाढ होत असल्यामुळे रिलायन्स इन्डस्ट्रीज आणि एसार ऑईल यासारख्या कंपन्या याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

किरकोळ एलपीजी बाजारात सध्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे नियंत्रण आहे. या कंपन्या ५ किलोग्रॅम, १४.२ किलोग्रॅम आणि १९ किलोग्रॅमचे एलपीजी सिलिंडरची विक्री करत आहेत. यातील १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर करण्यात येत आहे. खासगी कंपन्यांना सरकारकडून अनुदान देण्यात येत नाही आणि त्या इंधनाच्या बाजारातील दलानुसार विक्री करतात. मात्र सरकारच्या अनुदान धोरणानुसार १० लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱयांना अनुदान देण्यात येत नाही. या ग्राहकांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात खासगी कंपन्यांचा प्रयत्न आहे.

ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी रिलायन्सने मोबाईल ऍप्लिकेशन तयार केले आहे. मात्र ४-५ किलोग्रॅमच्या सिलिंडरची विक्री कोणत्या किमतीत करण्यात येईल हे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. गेल्या वर्षी सरकारने रिलायन्सला आपल्या प्रकल्पातून उत्पादन घेण्यात येणा-या १.२ लाख टनापर्यंतच्या एलपीजीची खासगीरित्या विक्री करण्यास मंजुरी दिली होती. दरवर्षी आपली विक्री १० टक्क्यांनी वाढेल असा कंपनीला विश्वास आहे.

Leave a Comment