२ लाखांनी स्वस्त झाली शेरवोलेट एन्जॉय

enjoy
मुंबई: एन्जॉय एमपीव्ही कारच्या किंमतीत शेरवोलेट कार कंपनीने भरघोस कपात केली असून तब्बल १.९३ लाख एवढी कपात एन्जॉय कारच्या किंमतीत करण्यात आली आहे. एन्जॉयच्या विक्रीत कंपनीच्या या निर्णयामुळे वाढ होण्याची कंपनीला आशा आहे.

एन्जॉय मारुतीची अर्टिगा आणि होंडाची मोबिलिओच्या तुलनेत ग्राहकांवर फार छाप पाडू शकली नव्हती. त्यामुळे याचे उत्पादन बंद होण्याचीही चर्चा होती. पण किंमतीत घट केल्याने ग्राहक एन्जॉयकडे पुन्हा आकर्षित होऊ शकतात अशी आशा कंपनीला आहे. किंमतीत कपात केल्यानंतर आता एन्जॉयच्या पेट्रोल व्हेरिएंटच्या बेसिक मॉडेलची किंमत ४.९९ लाख एवढी झाली आहे. तर ८ सीटर डिझेल बेस व्हेरिएंट एलएसची किंमत ५.९९ लाख रुपये झाली आहे. पेट्रोल व्हेरिएंटच्या टॉप मॉडेलच्या किंमत १.८ लाखाची घट झाली असून त्याची किंमत आता ६.२४ लाख झाली आहे. तर डिझेल व्हेरिएंटच्या टॉप मॉडेलमध्ये १.९३ लाखाची घट झाली असून त्याची किंमत आता ९.१७ लाख झाली आहे. एन्जॉय पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध आहे. तसेच दोन्ही इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Leave a Comment