सायरस मिस्त्रींची ‘टाटा’मधून उचलबांगडी

cyrus-mistry
मुंबई: टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी पुन्हा रतन टाटा चेअरमनपदाची धुरा सांभाळणार आहेत. रतन टाटा चार महिन्यांसाठी चेअरमनपदी असतील. त्यानंतर सर्च पॅनेल नव्या चेअरमनची निवड करेल.

सायरस मिस्त्री यांनी चार वर्षापूर्वीच टाटा समूहाच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली होती. चारवर्षापूर्वी रतन टाटांनी सायरस मिस्त्री ही जबाबदारी सांभाळतील असा विश्वास व्यक्त केला होता. सायरस मिस्त्री त्यावेळी शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रबंध निर्देशक होते. सायरस मिस्त्री २००६ पासून टाटा ग्रृपच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आहेत.

सायरस मिस्त्री यांचे शिक्षण लंडनमध्ये झाले असून इंपेरियल कॉलेजमध्ये त्यांनी सिव्हिल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतले आहे. सायरस मिस्त्री यांनी त्यानंतर लंडन बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतले. एक लाखांत चार चाकी गाडीचे स्वप्न ते जॅग्वारसारख्या बड्या कंपनीतील भागीदारी, अशा तमाम विक्रमांना नावावर करणारे रतन टाटा चार वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा चार महिन्यांसाठी ते चेअरमनपदी विराजमान होतील.

Leave a Comment