मार्च २०१७ पर्यंत घे फुकट !

jio
नवी दिल्ली : रिलायन्स जिओ ४जी वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून ४जी सेवा जिओने लाँच केल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत ग्राहकांना अनलिमिटेड डेटा प्लान तसेच फ्री व्हॉईस कॉल ही वेलकम ऑफर सुरु केली. मात्र आता असे ऐकण्यात येत आहे की कंपनी ही वेलकम ऑफर मार्च २०१७ पर्यंत वाढवण्याचा विचार करीत आहे. इकॉनमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपनी १० कोटी ग्राहकांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेऊ शकते.

Leave a Comment