सॅमसंगने लॉन्च केला तब्बल ६ जीबी रॅम, १६ मेगापिक्सेल कॅमेरावाला स्मार्टफोन

samsung
मुंबई : सॅमसंग या मोबाईल उत्पादक कंपनीने आपला बहुप्रतीक्षित गॅलेक्सी सी ९ प्रो हा स्मार्टफोन अखेर लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये तब्बल ६ जीबी रॅम देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन सध्या चीनमधील स्मार्टफोन बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत सुमारे ३१ हजार रुपये आहे.

या नव्या सी९ प्रो स्मार्टफोनमध्ये ६ इंचाचा डिस्प्ले (१९२०×१०८० पिक्सेल रिझॉल्युशन) आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६५३ प्रोसेसर आहे. ६ जीबी रॅम या स्मार्टफोनचे आकर्षण असून, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. एसडी कार्डच्या सहय्याने स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधाही आहे.

फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी स्मार्टफोनध्ये f/१.९ अपॅरचरसोबत १६ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि १६ मेगापिक्सेलचाच फ्रंट कॅमेरा आहे. त्यामुळे सेल्फीप्रेमींसाठीही हा स्मार्टफोन खास ठरणार आहे. फिंगरप्रिंट सेन्सरही या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहे.

उत्तम क्वालिटीच्या ऑडिओसाठी HiFi Codec देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग पे आणि NFC सपोर्टिव्ह आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये ४जी LTE, Type-C पोर्ट, जीपीएससारखे फीचर्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये ४०००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment