देशात सर्वात श्रीमंत आहे मुंबई; एकट्या मुंबईत ४५,००० कोट्यधीश

mumbai
नवी दिल्ली – देशात सर्वांत श्रीमंत शहर, तर जगात १४ व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर भारताची आर्थिक राजधानी आणि जगभरातील पर्यटकांची लाडकी मुंबई आहे. एकूण ५५ लाख कोटी रुपयांची संपत्ती मुंबईतील लोकांकडे आहे.

४५,००० कोट्यधीश आणि २८ अब्जाधीश या महानगरात राहतात. यानंतर दिल्ली दुसरे तर बंगळुरू तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार ही एकूण संपत्ती म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांची खासगी संपत्ती होय. यात त्यांची सर्व संपत्ती, रोख, शेअर बाजारातील गुंतवणूक इत्यादींचा समावेश आहे. यातून देणी वगळण्यात आली असून सरकारी निधी वेगळा ठेवण्यात आला आहे. अहवालानुसार, येत्या दहा वर्षांत भारतात रिअल इस्टेट, वित्तीय सेवा, आयटी, स्वास्थ्य, मीडिया या क्षेत्रांत चांगली वृद्धी होईल आणि नफाही वाढेल. दरम्यान ४ महानगरांपैकी फक्त चेन्नईचा टाप-५ श्रीमंत शहरांत समावेश नाही. हे शहर ७ व्या स्थानी आहे. येथील लोकांपेक्षा अधिक संपत्ती पुण्यातील लोक बाळगून आहेत. मात्र, चेन्नईत २,३०० कोट्यधीश अधिक आहेत.

Leave a Comment