ट्रायची जिओच्या मोफत व्हॉईस कॉलला संमती

jio1
नवी दिल्ली – ग्राहकांना मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने मोफत आयुष्यभर व्हॉईस कॉलची सेवा देत इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. याविरोधात बाजारात अगोदरच असणा-या कंपन्यांनी दूरसंचार नियामक ट्रायकडे तक्रार केली होती. मात्र या ऑफर अवैध ठरविण्यास ट्रायकडून नकार देण्यात आला आहे.

कायद्यानुसार रिलायन्स जिओकडून मोफत डेटा आणि व्हॉईस कॉलची सुविधा देता येणार नाही असे या कंपन्यांचे मत होते. भारती एअरटेल, व्होडाफोन या कंपन्याव्यतिरिक्त अन्य कंपन्यांनी ट्रायकडे धाव घेत जिओकडून सादर करण्यात आलेली ऑफर बंद करण्याची मागणी केली होती. या ऑफरमुळे आपल्या नेटवर्कवर ताण पडत असल्याचा या कंपन्यांचा आरोप होता. रिलायन्स जिओकडून मोफत सेवा ९० दिवसांसाठी देण्यात येत आहे. ३ डिसेंबर २०१६ पासून ग्राहकांना नियमानुसार ऑफरचा लाभ घेता येईल असे ट्रायने म्हटले. एका कंपनीच्या नेटवर्कवरून दुसऱया कंपनीला कॉल केल्यास प्रतिमिनिट १४ पैसे द्यावे लागतात. यालाच तंत्रज्ञान भाषेत इंटरकनेक्शन युजेस चार्ज असे म्हणतात.

Leave a Comment