दिवाळीपासून व्होडाफोनची रोमिंगमुक्त सेवा

vodafone
मुंबई – देशांतर्गत इनकमिंग कॉल व्होडाफोन इंडियाकडून सर्व ग्राहकांना विनामूल्य देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून व्होडाफोन इंडियाच्या सर्व ग्राहकांना या दिवाळीपासून देशांतर्गत कुठेही प्रवास करताना रोमिंगमुक्त सेवा मिळणार असून, या माध्यमातून त्यांना मनमुराद संवाद साधता येणार आहे. या नव्या उपक्रमाबद्दल व्होडाफोन इंडियाचे वाणिज्य विभागाचे संचालक संदीप कटारीया म्हणाले, व्होडाफोनने २०० दशलक्ष ग्राहकांचा टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विनामूल्य रोमिंग फोनसेवा देण्यात येत आहे. आमचे ग्राहक निश्चिंत मनाने आता शहराबाहेर प्रवास करू शकतील. या दिवाळी भेटीमुळे आमच्या ग्राहकांना देशाच्या कुठल्याही कोपऱयातून आपल्या प्रियजनांशी कुठल्याही काळजीशिवाय संवाद साधता येणार आहे.

Leave a Comment