श्याओमीने १८ दिवसांत विकले १० लाख स्मार्टफोन

xiomi
भारतात चीनी मालावर बहिष्कार घालण्यासाठी सुरू झालेल्या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसतानाच चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी श्याओमीने आक्टोबरच्या पहिल्या १८ दिवसांत तब्बल १० लाख स्मार्टफोन विकून नवीन रेकॉर्ड केले आहे.बिजिंगच्या या कंपनीने भारतात येत्या ३ ते पाच वर्षात सर्वात मोठे स्मार्टफोन व्हेंडॉर बनण्याचा इरादाही व्यक्त केला आहे. दिवाळी सीझन निमित्त सुरू असलेल्या विक्री अभियानात श्याओमीने हे फोन विकले आहेत.

कंपनीचे संस्थापक व सीईओ लई जून म्हणाले भारत आमच्यासाठी फारच महत्त्वाचे मार्केट आहे. कंपनीच्या जागतिक धोरणनितीनुसार मेन लँड चायना नंतर भारत हे आमचे जगातले दोन नंबरचे मोठे मार्केट बनले आहे. भारतात कंपनी विस्तार, पुरवठा व आफ्टरसेल्स क्षेत्रात आणखी गुंतवणुक करण्यास प्राधान्य देत आहे. प्रतिस्पर्धी कंपनी ह्युवाई टेक्नॉलॉजी ने त्यांचे स्मार्टफोन भारतात असेंबल करायची सुरवात आक्टोबरमध्येच केली आहे त्या पार्श्वभूमीवर श्याओमीने एवढ्या प्रचंड संख्येने विकलेले फोन व नवीन गुंतवणुकीची घोषणा यांना विशेष महत्त्व दिले जात आहे.