एटीएमशी जोडलेल्या कांही रोचक गोष्टी

nathula
आज कोपर्‍याकोपर्‍यावर दिसणारी व पैशांपासून सोने, पाणी देणारी एटीएम जगात चांगलीच स्थिरावली आहेत. या एटीएमची सुरवात ४७ वर्षांपूर्वी २ सप्टेंबर १९६९ ला सर्वसामान्य नागरिकांसाठी झाली. केमिकल बँक इन रकविले सेंटर न्यूयॉर्क ने ही सुरवात केली मात्र त्यापूर्वी २७ जून १९६७ रोजी लंडनच्या बारक्लेज बँकेतही एटीएम बसविले गेले होते. पण ते बँकेच्या आत होते. एटीएचा जनक म्हणून स्कॉटलंडच्या जॉन शेफर्ड बॅरन याचे नांव घेतले जाते. या जॉनचा जन्म भारतात २३ जून १९२५ रोजी मेघालयातील शिलाँग येथे झाला होता हे अनेकांना माहिती नसेल.

जॉन एकदा पैसे काढण्यासाठी बँकेत गेला पण त्याला थोडा उशीर झाल्याने बँक बंद झाली होती. तेव्हाच त्याच्या मनात बँकेबाहेर असे एखादे मशीन असले पाहिजे की ज्यातून २४ तास कधीही पैसे काढता येतील अशी कल्पना आली व ती त्याने एटीएम च्या रूपाने प्रत्यक्षात उतरविली असा एटीएमचा इतिहास सांगितला जातो. असेही सांगतात की जॉनला एटीएमसाठी सहा आकडी पिन ठेवायचा होता पण त्याच्या बायको ला इतके आकडे लक्षात ठेवणे अवघड जायचे म्हणून त्याने चार आकडी पिन ठरविला.

gold-atam
भारतात एटीएमची सुरवात १९८७ साली मुंबईत एचएसबीसी बँकेने केली. भारतात तरंगते एटीएमही असून ते केरळच्या कोचीमधील झंकार मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने बसविले आहे. त्याची मालकी केरळ शिपिंग अॅन्ड इनलंड नेव्हीगेशन कार्पोरेशनकडे आहे. एटीएम तंत्रज्ञानात आता इतकी सुधारणा झाली आहे की विना बँक अकौंटही एटीएमचा वापर करता येतो. भारतासह अनेक देशात बायोमेट्रीक एटीएम वापरली जातात जेथे तुम्हाला फिंगरप्रिटचा वापर करावा लागतो.

kerala
एटीएमची आणखीही कांही नांवे आहेत. यूकेमध्ये ते कॅश पॉईंट किवा कॅश मशीन या नावाने ओळखले जाते. आबुधाबीच्या अमीरात हॉटेलमध्ये सोने देणारे एटीएमही बसविले गेले आहे. त्यातून ३२० प्रकारच्या सोन्याच्या वस्तू मिळू शकतात. समजा एखादे एटीएम चोरांना पळविले तरी ते जास्त लांब जाऊ शकत नाही कारण त्यात जीपीएस चिप बसविलेली असते त्यामुळे त्याचा माग घेता येतो. तसेच कोणी जबरदस्तीने अथवा मशीन तोडून नोटा बाहेर काढायचा प्रयत्न केला तर तोही सफल होऊ शकत नाही कारण जेथे नोटा भरलेल्या असतात तेथेच एक निळ्या शाईची बाटलीही असते. वरील प्रकारचा प्रयत्न केला गेला तर ही बाटली फुटते व त्यातील शाई नोटांवर पसरते.

भारतात सर्वाधिक उंचीवर बसविले गेलेले एटीएम भारत चीन सीमेवरील नथुला पास येथे आहे. हे एटीएम समुद्रसपाटीपासून १४३०० फूट उंचीवर आहे व ते आर्मीसाठी बसविले गेले आहे.

Leave a Comment