इस्टोनिया देशाच्या विकासदराऐवढी मुकेश अंबानी यांची संपत्ती

mukesh-ambani
नवी दिल्ली : सलग नवव्यांदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अव्वल स्थानी कायम राहण्याची किमया साधली असून फोर्ब्स इंडियाच्या माहितीनुसार, झपाट्याने अंबानी यांच्या एकूण संपत्तीत वाढ होत असून ती संपत्ती २२.७ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचली आहे. युरोप खंडातील इस्टोनिया देशाच्या विकासदराइतकी अंबानी यांची ही संपत्ती आहे.

सन फार्माचे दिलीप संघवी यांची संपत्ती १६.९ अब्ज डॉलर असून ते भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. भारतातील १०० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत हिंदुजा परिवार १५.२ अब्ज संपत्तीसह तिसऱ्या स्थानी आहे.

विप्रोचे अझीम प्रेमजी हे देशातील चौथे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे एकूण १५ अब्ज डॉलर संपत्ती आहे, जी मोझाम्बिक देशाच्या १४.७ अब्ज डॉलर विकासदरापेक्षाही अधिक आहे. पल्लोनजी मिस्त्री यांची संपती १३.९० अब्ज डॉलर असून ते यादीत पाचव्या स्थानी आहेत.

Leave a Comment