दोस्तीचे प्रतीक कृष्ण सुदामा मंदिर

sudama
भारतात जेवढी कृष्णमंदिरे आहेत त्या प्रत्येकाचे कांही ना कांही वेगळेपण आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन पासून जवळ असलेले नारायण धाम याला अपवाद नाही. हे मंदिर श्रीकृष्ण व त्याचा बालसखा सुदामा यांच्या मैत्रीला समर्पित आहे. या मंदिरात श्रीकृष्ण व सुदामा अशा दोघांच्याही मूर्ती आहेत. उज्जैनजवळील महिदपूर तहसीलापासून ९ किमी अंतरावर हे देशातील एकमेव कृष्ण सुदामा मंदिर आहे.

श्रीकृष्ण शिक्षणासाठी गुरूगृही म्हणजे उज्जैन येथील संदिपनी गुरूंच्या आश्रमात राहिला होता. तेथेच गरीब घरातला सुदामाही शिक्षण घेत होता. भागवतात असा उल्लेख आहे की एक दिवस गुरूपत्नीने या दोघांना जळणासाठी लाकूड आणायला पाठविले होते. कृष्ण सुदामा जंगलात गेले पण जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे तोडलेली लाकडाची मोळी एका ठिकाणी ठेवून त्यांनी पावसापासून आश्रय मिळविला. जेथे ते पाऊस आल्यामुळे थांबले त्याच ठिकाणी हे मंदिर बांधले गेले आहे.

असेही सांगतात, की या मंदिराभोवती असलेले वृक्ष म्हणजे श्रीकृष्ण सुदामांनी तोडलेली लाकडे जेथे ठेवली होती त्या लाकडानाच पुन्हा पालवी येऊन बहरले त्यामुळे येथे झाडीही खूप आहे.

Leave a Comment