थकबाकीदारांच्या घरी आता सेबी बडविणार ढोल

sebi
नवी दिल्ली – सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे थकबाकीदार आणि घोटाळेबाज तत्काळ पैसे परत करत नाहीत. सेबी या नियामक संस्थेने अशा लबाड लोकांना समन्स पाठविण्यासाठी नवीन पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, अशा लोकांच्या घरी आता ढोल बडविणे आणि लाऊड स्पीकर्सच्या सहाय्याने समन्स पाठविण्याचे काम करण्यात येणार आहे. सेबीने हे पाऊल यापूर्वी अनेक घोटाळे आणि गुंतवणूकदारांचे पैसे थकीत ठेवण्यात आल्याने उचलले आहे. याचबरोबर सामान्य लोकांकडून पैसे गोळा करणा-या व्यक्तींना आपल्या संपत्ती ऍटॅच करण्यास सांगण्यात आले होते.

सेबी सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या व्यक्तींना समन्स पाठविण्यासाठी थर्ड पार्टी संस्थेची मदत घेऊ शकते. यामध्ये समन्स पाठविणे, ऍटॅचमेंटची माहिती सार्वजनिक करणे, विक्रीची नोटीस यांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी सेबी अशा थर्ड पार्टी कंपन्यांनी संपर्क साधत त्यांनी थकबाकीदारांचे पत्ते देण्यात येतील. मात्र यासाठी रिकव्हरी कामाचे चांगले रेकॉर्ड असणाऱया कंपनी, एजन्सी यांची निवड करण्यात येईल. यानंतर या कंपन्या, एजन्सी पत्त्यावर जात ऑर्डर, नोटीस, समन्स, पत्र ढोल वाजवित सादर करेल असे सेबीकडून सांगण्यात आले.

थकबाकीदार व्यक्तींच्या नजीकच्या लोकांना अशा लोकांच्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी या प्रकारची ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यावेळी ढोल जोरदार वाजवित लाऊड स्पीकर्सच्या सहाय्याने जोरदार घोषणा देत माहिती देण्यात येईल. यासाठी स्थानिक अधिकाऱयांना यापूर्वी अगोदरच माहिती देण्यात येईल असे सेबीन म्हटले.

Leave a Comment