जिओच्या ४जीचा स्पीड सर्वात कमी

jio
नवी दिल्ली : ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार जिओच्या ४जी सर्व्हिसचा स्पीड इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रायच्या रिपोर्टनुसार, सर्वाधिक स्पीड एअरटेलचा असून एअरटेल या यादीत अव्वल स्थानी, त्यानंतर अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स दुसऱ्या स्थानी, तिसऱ्या स्थानी आयडिया, चौथ्या स्थानी वोडाफोन आणि पाचव्या स्थानी जिओचा नंबर लागतो.

एअरटेलचा स्पीड ११.४ एमबीपीएस आहे. त्यापाठोपाठ अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा स्पीड ७.९ एमबीपीएस, आयडियाचा स्पीड ७.६ एमबीपीएस आणि वोडाफोनचा ७.३ एमबीपीएस आहे. जिओचा स्पीड केवळ ६.२ एमबीपीएस एवढा आहे.

Leave a Comment