मोबाईल, डेस्कटॉप गुगल नेटसर्च वेगवेगळे दिसणार?

search
गुगल सर्च या जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनकडून स्मार्टफोन व डेस्कटॉपवर केल्या जाणार्‍या सर्चचे परिणाम वेगवेगळे दिसावेत असे तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे समजते. त्यासाठी मोबाईल इंडक्स तयार करण्याचे काम सुरू असून यामुळे जे सर्च मोबाईल वर केले जातील त्याच परिणाम फक्त मोबाईलचवरच पाहता येतील. डेस्कटॉपसाठीचा इंडेक्स मोबाईल प्रमाणे वारंवार अपडेट केला जाणार नाही असेही समजते.

मोबाईल सर्चचा वापर वाढावा यासाठी गुगल प्रयत्नशील आहे.डिजिटल ट्रेंड नुसार येत्या कांही महिन्यातच स्मार्टफोनसाठी वेगळा सर्च इंडेक्स लाँच केल्याची घोषणा कंपनीकडून केली जाईल. यामुळे गुगलला त्यांच्या ग्राहकांपर्यंत माहिती पाहोचविणे अधिक सुलभ होणार आहे. कांही महिन्यांपूर्वी गुगलने अॅक्सिलरेटेड मोबाईल पेज लाँच केले आहे त्यामुळे त्यांना कोणताही सर्च कंटेट स्मार्टफोनवर त्वरीत दाखविता येतो आहे. भारतात मोबाईल ब्रॉडबँड इंटरनेटचा वापर करणार्‍या ग्राहकांची संख्या ३५ कोटींवर गेली आहे व कंपन्यांना मोबाईलवर इंटरनेट पोहोचविणे खूप स्वस्तातही पडते आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या खास मोबाईलसाठीच्या वेबसाईटही तयार केल्या आहेत.
———-

Leave a Comment