ई कॉमर्स कंपन्यांना छोट्या शहरातून चांगला प्रतिसाद

ecommerce
फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील यासारख्या ई कॉमर्स कंपन्यांनी दिवाळी निमित्त लावलेल्या त्यांच्या मेगा सेलला छोट्या व मध्यम शहरातून यंदा उत्तम प्रतिसाद मिळाला आहेच पण मिझोराम, मेघालय,हिमाचल प्रदेश, गोवा, जम्मू काश्मीर या राज्यातील ग्राहकांकडूनची मालासाठी मागणी नोंदविली गेल्याचे समजते. या कंपन्यांच्या सेलमधील ४० टक्के हिस्सा हा छोट्या, मध्यम शहरातील ग्राहकांचा आहे.तसेच या सेलमध्ये सर्वाधिक डिमांड स्मार्टफोनसाठी असल्याचेही दिसून आले आहे.

स्नॅपडीलकडे त्यांच्या एकूण ग्राहक ऑर्डरपैकी ८० टक्के ऑर्डर्स मोबाईलसाठी असल्याचे सांगितले गेले आहे. त्यांच्या विक्रीत यंदा छोट्या व मध्यम शहरातील ग्राहकांत २० टक्के वाढ नोंदविली गेली आहे तर अमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये ग्राहकसंख्या पाचपट वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा छोट्या व मध्यम शहरातील ऑर्डर्स ६५ टक्के आहेत. त्यांच्याकडे एकूण दीड कोटींहून अधिक ऑर्डर्स आल्या आहेत. याचाच अर्थ एका सेकंदाला ३८ ऑर्डर्स. फ्लिपकार्टनेही एका दिवसांत १४०० कोटींच्या ऑर्डर्स मिळविल्या असून त्यातील ५० ट्क्के हिस्सा स्मार्टफोनचा आहे. पाच दिवसात त्यांनी ३३५० कोटींचे टार्गेट ठेवले असून आज त्यांच्या सेलचा शेवटचा दिवस आहे.

Leave a Comment