भारतात बनवलेले साहित्य चीनशी टक्कर देऊ शकत नाही

china
नवी दिल्ली: पाकिस्तानशी संबंध तोडण्याचा विचार भारताने केल्यावर पाकिस्तानची तळी उचलण्याचा कार्यक्रम चीनने हाती घेतला. भारतात चीनच्या या उद्योगामुळे जोरदार नाराजी पसरली असून, सोशल मीडियावर चीनी उत्पादने खरेदी करण्यावर बंधी घालावी, अशा आषयाची एक मोहीमच सुरू झाल्यामुळे चीनचा तिळपापड झाला असून, त्या रागातूनच चीन वृत्तपत्रांनी भारताव टीका केली आहे. चीनविरोधात भारतीय सोशल मीडियावर उत्साह दाखवणे बेकार असून भारतात बनवलेले साहित्य चीनशी टक्कर देऊ शकत नसल्याचे, चीनमधील वृत्तपत्रातील एका लेखात म्हटले आहे. भारत सरकारने भारत-चीनमधील व्यापारी नुकसानाबद्दल ओरडण्याची गरज आहे. परंतु वास्तव हे आहे की, त्यासाठी ते काहीच करत नाहीत, असेही या वृत्तपत्राने म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाचीही चीनी वृत्तपत्राने खिल्ली उडवली आहे. मोदींच्या या अभियानाची खिल्ली उडवताना ‘चिनी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे. भारतात भ्रष्टाचार मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे चिनी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करु नये असा सल्ला दिला आहे. भारतात मेक इन इंडिया हे अभियान यशस्वी होणार नाही, असेही या वृत्तपत्राने म्हटले आहे. भारत अजूनही रस्ते, महामार्ग या समस्येतच अडकला असल्याचा टोलाही या वृत्तपत्रांनी लागावला आहे.

Leave a Comment