पुण्यात बीएमडब्ल्यूने सुरु केली आफ्टरसेल्स सुविधा

bmw
पुणे -बेवेरिया मोटर्ससह पश्चिम भारतासाठी बीएमडब्ल्यू इंडियाकडून सर्वांत मोठी आफ्टरसेल्स सुविधा दाखल करण्यात आली आहे. पुण्यात ही सुविधा बेवेरिया, हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथे उपलब्ध असणार आहे.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष (ऍक्ट) प्रँक श्लोडर याबाबत बोलताना म्हणाले, बीएमडब्ल्यूने कंपनीच्या स्थापनेपासून तिची सर्वांत महत्त्वाकांक्षी उत्पादन रेंज, अद्वितीय व इर्मसिव्ह ब्रँड अनुभव करणारे उपक्रम आणि अद्वितीय आफ्टरसेल्स सर्व्हिससह परिपूर्ण आरामदायी अनुभव दिला आहे. उद्योग क्षेत्रात य्नवा मापदंड निर्माण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

बेवेरिया मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर विशाल आगरवाल म्हणाले, पुण्यात जागतिक दर्जाची सुविधा देण्याच्या दृष्टीने बीएमडब्ल्यूला सहय़ोग देताना आनंद वाटत आहे. शहराची वाढती लक्झरी कार बाजारपेठ क्षमता वाढविण्यासह ग्राहकांना सेवा देण्यास आमचे कायम प्राधान्य राहील.

Leave a Comment