आता टीव्हीवर देखील पाहू शकता फेसबुक व्हिडीओ

facebook
न्युयॉर्क – सोशल मीडियात अग्रस्थानी असलेले फेसबुक आपल्या युझर्सना नेहमीच काही न काही नवीन देत असते. यावेळी आता फेसबुक एक नवे फिचर घेऊन आले आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला टीव्हीवर व्हिडीओ क्लिप पाहण्याची सुविधा मिळणार आहे.

याबाबत तंत्रज्ञानविषयक एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आयओएस ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्टफोन सोबत युझर्स अॅपल टीव्ही, एअरप्ले डिव्हाईस, गुगल क्रोमकास्ट आणि गूगल कास्ट डिव्हाईसच्या माध्यमातून तुम्ही तुमचे व्हिडीओ पाहू शकता. फेसबुकला या निर्णयामुळे आपले उत्पन्न वाढीस मदत होऊ शकते.

या नवीन फिचरचा वापर करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला स्मार्टफोन अथवा डेस्कटॉपवर व्हिडीओ शोधावा लागेल. त्यानंतर टीव्हीवर आपल्याला ते डिव्हाईस शोधावे लागेल ज्याच्या माध्यमातून व्हिडीओ पहायचा आहे.

Leave a Comment