बोली न लावताच संपला माल्ल्याच्या ‘व्हिला’चा लिलाव

kingfisher
पणजी- एकाही व्यक्ती अथवा संस्थेने बोली न लावताच किंगफिशर कंपनीच्या गोव्यातील आलिशान व्हिलाचा लिलाव संपला.

पूर्वी या व्हिलाचे मालक असलेले विजय माल्ल्या यांच्यावर ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याचा आरोप आहे. ई-लिलावामध्ये या व्हिलाची सुरवातीची किंमत (बेस प्राइस) ८५.२९ कोटी रुपये ठेवण्यात आली होती. भारतीय स्टेट बँकेच्या पुढाकाराने १७ बँकांनी मिळून या व्हिलाचा ऑनलाइन लिलाव ठेवला होता. हा ऑनलाइन लिलाव सकाळी ११.३० पासून १२ वाजेपर्यंत होणार होता. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकही बोली न लागल्याने लिलाव संपविण्यात आला. विजय माल्ल्या यांच्या या व्हिलामध्ये पूर्वी आलिशान पार्ट्या होत असत. युनायटे स्पिरिट्ससोबत झालेल्या कायदेशीर लढाईनंतर मे, २०१६ मध्ये बँकांना या व्हिलाचा ताबा मिळाला होता.

Leave a Comment