दोन रंगात का मिळते जिओचे सिम ?

jio1
नवी दिल्लीः सध्या रिलायन्स जिओ सिम घेण्यासाठी ग्राहकांची एक गर्दी उडाली आहे. केवळ दोनच रंगांच्या पॉकेटमध्ये हे सिम उपलब्ध आहे. मात्र या दोन रंगांमागे काय कारण आहे, असा प्रश्नही कोणाला पडला नसेल.

ऑरेंज कलरमध्ये असणारे सिम कंपनीने प्रीव्ह्यूच्या वेळी लाँच केले होते. या रंगामधील सिमचा स्टॉक ५ सप्टेंबर पूर्वीचा आहे. हे सिम नंबरसह उपलब्ध असल्याने यामध्ये पोर्टेबिलीटीची सुविधा नाही. तर ब्ल्यू पॉकेटमध्ये मिळणारे सिम कंपनीने ठरवलेल्या नंबरसह उपलब्ध असून या सिमचा नंबर eKYC प्रोसेस करताना जनरेट केला जातो. त्यामुळे या रंगाच्या पॉकेटमधील सिम घेताना ग्राहकांना आवडता नंबर घेता येत नाही.

सध्या ऑरेंज पॉकेटमध्ये असणारे सिम बाजारातून जवळपास संपलेले असल्यामुळे ग्राहकांना आता केवळ ब्ल्यू पॉकेटमधील सिमची विक्री केली जात आहे. दोन्हीही रंगांचे सिम खरेदी केलेल्या ग्राहकांना जिओच्या ऑफरचा फायदा ३१ डिसेंबरपर्यंत मिळणार आहे.

Leave a Comment