देशातील सत्यभामेचे एकमेव मंदिर

satyamma
भारतात श्रीकृष्णाची मंदिरे प्रत्येक गावात आहेत. मात्र त्यांच्या पत्नींची मंदिरे फारच तुरळक ठिकाणी आहेत. श्रीकृष्णाच्या आठ पट्टराण्यातील एक असलेल्या देवी सत्यभामेचे देशातील एकमेव मंदिर आंध्रप्रदेशातील सत्यसाईबाबांमुळे प्रसिद्धीस आलेल्या पुटटुपथी येथे आहे. विशेष म्हणजे या मंदिराची स्थापना सत्यसाईबाबांच्या आजोबांनी केली आहे.

असे सांगतात की सत्यसाईबाबांच्या आजोबांना सत्यभामेने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला व या जागी मंदिर बनवायचा आदेश दिला त्यानुसार हे मंदिर बांधले गेले. सत्यभामा ही इच्छाशक्तीची देवी असल्याचे वर्णन पुराणातून केले गेले आहे. त्यामुळे या मंदिरात येऊन दर्शन घेणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असा समज असून येथे दरवर्षीच भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिरात दर्शनास येणार्‍यांवर श्रीकृष्ण प्रसन्स होतात असाही विश्वास आहे. या मंदिरात देवी सत्यभामेची तीन फुटांची सुंदर संगमरवरी मूर्ती असून गर्भगृहात या मूर्तीभोवती श्रीकृष्णाचे अनेक फोटो आहेत. मार्च ते आक्टोबर हा काळ येथे येण्यासाठी चांगला मानला जातो.

या मंदिराच्या जवळच अंजनेय हनुमान मंदिर आहे. तसेच मेडीटेशन ट्री हा प्रसिद्ध वृक्षही आहे. या वृक्षाखाली बसल्याने एकाग्रता वाढते असे भाविक सांगतात. येथेच प्रशंाती निलयम हा सत्यसाईबाबांचा आश्रम आहे.

Leave a Comment