देखणी व महागडी व्हेस्पा एंपोरिओ अरमानी भारतात

emporio
इटलीच्या टू व्हीलर ब्रँड पियोजियो ने त्यांची प्रिमियम स्कूटर व्हेस्पा ९४६ भारतात २५ आक्टोबर रोजी दाखल होत असल्याचे जाहीर केले असून भारतात या स्कूटरचे एंपोरिओ अरमानी हे व्हेरिएंट सादर केले जात आहे. ही नवी स्कूटर बाजारातील सध्याच्या कोणत्याही स्कूटरपेक्षा देखणी आहे तशीच महागडीही आहे. या स्कूटरची किंमत ८ ते ९ लाख रूपये असेल असे समजते. २५ आक्टोबरला कंपनीचा वर्धापनदिन आहे त्यामुळे त्यासाठी बनविलेली एडिशनही या वेळी लाँच केली जाईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

ही स्कूटर इटालीतील प्रकल्पातच पूर्णपणे तयार केली गेली असून तेथून ती भारतात विक्रीसाठी आणली जाणारआहे. फोर स्रोी क १२५ सीसीच्या या स्कूटरला ३ व्हॉल्ट मोनोसिलींडर इंजिन दिले गेले आहे. एलईडी हेडलँप, एलसीडी इंन्स्ट्रूमेंटल पॅनल, एबीएस फिचर, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, अँटी स्लिप रेग्युलेटर डिस्क ब्रेक अशी तिची अन्य फिचर्स आहेत. ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये ती सादर केली गेली होती. ही सर्वाधिक स्टायलीश स्कूटर असल्याचाही दावा केला जात आहे.

Leave a Comment