एसबीआयच्या ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक

sbi
मुंबई : काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळपास सहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत. बँकेकडून हे पाऊल एसबीआयच्या सिस्टीममध्ये सुरक्षेशी निगडीत व्हायरस शिरण्याच्या भीतीमुळे त्यावर उपाय म्हणून उचलण्यात आले आहे. कार्ड्स कुठलीही पूर्वसूचना न देता ब्लॉक झाल्याने ग्राहक आश्चर्यचकित झाले होते. यामुळे अनेकांना काही काळ त्रास सहन करावा लागणार आहे.

इतर बँकांच्या काही एटीएममध्ये ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीला धोका पोहचवणारे बग म्हणजेच व्हायरस शिरले आहेत. ज्या ग्राहकांनी असे एटीएम वापरले आहेत, त्यांना हा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसबीआयने सव्वासहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक केली आहेत. संशयास्पद ट्रान्झॅक्शन्स आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment