सरकारी कर्मचा-यांसाठी महिंद्राची ‘सरकार डिस्काऊंट’ स्कीम

diwali
नवी दिल्ली – फेस्टीव्हल सीझनमध्ये सध्या अनेक गोष्टींवर ऑफर्सचा वर्षाव सुरू असून त्यात आता ऑटोमोबाईल मार्केटमध्येही भरभरून डिस्काऊंट दिला जात आहे. अनेक दर्जेदार कार्सवर दिवाळी स्पेशल या ऑफरमध्ये मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. २ लाखांपर्यंतचा डिस्काऊंट मारूती, होंडा, हुंद्यई सारख्या टॉप कार्सवर दिला जात आहे. एवढेच नाहीतर ७ वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचा-यांसाठीही खास स्कीम दिल्या जात आहेत. महिंद्रा कंपनीने सरकारी कर्मचा-यांसाठी ‘सरकार डिस्काऊंट’ स्कीम सुरू केली आहे.

या वेगवेगळ्या कार्सवर वेगवेगळे ऑफर्स असून यातील मारूतीने सर्वात मोठी ऑफर दिली आहे. मारूतीची कोणतीही कार खरेदी केल्यावर त्यासोबत एक कुपन दिले जाईल. यात लकी ड्रॉ नुसार विजेते निवडले जातील. जर यात तुम्ही विजेते ठरले तर तुम्ही एकाच किंमतीच्या दोन कार दिल्या जातील. कार्सवर असलेल्या या ऑफर्सबाबत दैनिक भास्करच्या www.bhaskar.com या वेबसाईटवर वृत्त देण्यात आले आहे.
maruti
मारूतीच्या अल्टो ८०० या कारवर १५ हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट, के १० वर १५ हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट, वॅगनॉर कारवर ३० हजारांपर्यंतचा डिस्काऊंट, वॅगनॉर ऑटोगेअरवर २५ हजारापर्यंत, स्टिंग रे कारवर ३० हजारांपर्यंत, सिलेरियो पेट्रोल कारवर १५ हजार रूपयांपर्यंत, सिलेरियो डीजल कारवर २५ हजारांपर्यंत, स्विफ्ट पेट्रोल कारवर ५ हजारांपर्यंत, स्विफ्ट डीजल कारवर १५ हजारांपर्यंत, रिट्ज पेट्रोल कारवर १५ हजारांपर्यंत, रिट्ज डीजल कारवर २५ हजारांपर्यंत, डिजायर पेट्रोल कारवर १५ हजारांपर्यंत, डिजायर डीजल कारवर १० हजारांपर्यंत, अर्टिका कारवर १० हजारांपर्यंत, सियाज पेट्रोल कारवर १५ हजारांपर्यंत, तर ओमिनि कारवर २५ हजारांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहेत.
honda
होंडाने त्यांच्या मोबिलिओ मॉडलवर २ लाख रूपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट ठेवला आहे. जॅज कारवर ४० हजार रूपयांचा कॅश डिस्काऊंट, ब्रिओ फ्रि इन्श्युरन्स, सिटी कारवर फ्रि इन्श्युरन्स आणि १५ हजारांचा कॅश डिस्काऊंट, बीआरव्ही कारवर १० हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट, अमेज कारवर ४३ हजारांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट दिला आहे.
hyundai
आपल्या सर्वच कारवर ह्युंदाई सुद्धा डिस्काऊंट देत आहेत. मात्र, सॅंटा फे आणि वर्ना मॉडलवर ते साधारण १ ते २ लाख रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट देत आहेत. ईऑन कारवर ६० हजारपर्यंतचा डिस्काऊंट, आय१० कारवर ५३ हजारपर्यंतचा डिस्काऊंट, ग्रँड – आय १० पेट्रोल कारवर ८३ हजारांपर्यंतचा डिस्काऊंट, ग्रँड – आय १० डीजल कारवर ९१ हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट, एक्ससेंट पेट्रोल कारवर ४७ हजारापर्यंत, एक्ससेंट डीजल कारवर ५७ हजारांपर्यंत डिस्काऊंट, आय २० ईलाईट पेट्रोल कारवर १० हजारांपर्यंत, आय २० ईलाईट डीजल कारवर १० हजारांपर्यंत, वेरना पेट्रोल कारवर १ लाख रूपयांपर्यंत डिस्काऊंट, वेरना डीजल कारवर १ लाखांपर्यंत डिस्काऊंट, ह्युंदाई संता फे कारवर २ लाखांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.
mahindra
महिंद्राच्या केयूव्ही कारवर २२ हजारांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट, फ्रि इन्श्युरंन्स आणि २५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जातोय. बोलेरो कारवर ४३ हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट, १५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस, स्कॉर्पियो कारवर १५ हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट, १५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि १० हजारांपर्यंत कॉर्पोरेट बोनस, टीयुव्ही कारवर २६ हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट, एक्सयुव्ही कारवर ३३ हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट, १५ हजारांचे एक्सचेंज बोनस, टीयुव्ही कारवर २६ हजारांपर्यंत कॅश डिस्काऊंट आणि २५ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

Leave a Comment