विविध देशांत या स्मार्टफोन्सवर आहे बॅन

bam
सॅमसंगच्या नव्या गॅलॅक्सी नोट ७ वर जपान, यूएस सह अनेक देशांनी हा फोन विमानात वापरण्यावर बॅन आणला असल्याचे आपल्याला माहिती आहे. या फोनच्या बॅटरीने आग पकडण्याच्या घटना घडल्याने ही बंदी घातली गेली असली तरी अनेक देशात विविध प्रकारच्या स्मार्टफोनवर बॅन आहे हे कदाचित आपल्याला माहिती नसेल.

चीनमध्ये अॅपलच्या आयफोन सिक्स, प्लस व एस या सर्व व्हेरिएंटच्या विक्रीवर बंदी आहे. या मॉडेलशी मिळतेजुळते अनेक फोन चीनमध्ये यापूर्वीच वापरात असल्याने ही बंदी घातल्याचे समर्थन चीन सरकारने केले आहे मात्र अॅपलने या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. पाकिस्तानात शाओमीच्या स्मार्टफोन विक्रीवर बंदी आहे.ऑगस्टपासून हा बॅन लागू करण्यात आला आहे व त्यासाठी ही कंपनी देशाचे कायदे पाळत नसल्याचे स्पष्टीकरण पाक सरकारने दिले आहे.

अमेरिकेत चीनच्य हुवाई कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीवर बंदी आहे. त्यामागे हुवेईचा मालक चीनी लष्कराशी संबंधित असल्याचे कारण आहे तर भारताच्या कांही भागात शाओमी स्मार्टफोन वापरावर बंदी आहे. यात प्रामुख्याने सैनिक व लष्कर व लष्कराशी संबंधित विभागातील कर्मचार्‍यांसाठी ही बंदी लागू केली गेली आहे. शाओमीचे डेटा सेंटर भारतात नसल्याने ही बंदी घातली गेल्याचे समजते.

Leave a Comment