फिंगरप्रिंट सेन्सरवाला पॅनासॉनिकचा ‘इलुगा टॅप’ लॉन्च

panasonic
मुंबई : आपला नवा स्मार्टफोन ‘इलुगा टॅप’ पॅनासॉनिक इंडियाने लॉन्च केला असून या स्मार्टफोनचे उत्तम प्रोसेसर आणि फ्रंट फिंगरप्रिंट स्कॅनर हे वैशिष्ट्य असून, याची किंमत ८ हजार ९९० रुपये आहे. ज्यांना नवीन स्मार्टफोन १० हजार रुपयांच्या आत घ्यायचाय आहे, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरु शकेल.

याफोनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले, ८ मेगापिक्सेल रिअर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज (३२ जीबी पर्यंत वाढवण्याची सुविधा), २ जीबी रॅम, 1.25GHz क्वाड-कोर प्रोसेसर, ४जी VoLTE सुविधा देण्यात आल्या आहेत. पॅनासॉनिक इंडियाच्या माहितीनुसार, इलुगा टॅपचे फास्ट फिंगरप्रिंट फ्रंट सेन्सरमुळे यूझर्सना डिव्हाईस उघडण्यासाठी सोपे जाते. मात्र, यूझर्सची खासगी माहितीही गुप्त ठेवली जाते. स्कॅनरच्या सहाय्याने अगदी काही सेकंदात डिव्हाईस उघडणे शक्य होणार आहे.

Leave a Comment