प्रभू श्रीराम श्रीलंकेतून अयोध्येत २१ दिवसांत पोहोचले

map
नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामचंद्रांविषयी एक पोस्ट व्हायरल झाली असून ‘फेसबुक’वर शेअर झालेल्या पोस्टनुसार, दसर्‍यानंतर २१ दिवसांनी देशात मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जाते. या मागे खास कारणही आहे. ते म्हणजे, दसर्‍याच्या दिवशी रावणाचा वध केल्यानंतर श्रीराम श्रीलंकेहून अयोध्येसाठी पायी निघाले होते. २५८६ किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी २१ दिवसांत पूर्ण केला होता. या पोस्टचे वैशिष्ट्य म्हणजे, फेसबूकवरील पोस्टसोबत ‘गूगल मॅप’चा एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे.

श्रीलंका ते अयोध्येतील अंतर २५८६ किलोमीटर आहे. हे अंतर पायी चालून पार करायचे झाल्यास २१ दिवस (५१४ तास) लागतात, असा पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, दररोज जवळपास १२३ किलोमीटर पायी चालावे लागेल. तेही न थांबता. एक तासांत पाच किलोमीटर चालावे लागेल. ही पोस्ट फेसबुक व्यतिरिक्त व्हॉट्सअॅपवरही मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे.

‘ट्विटर’वर देखील ‘रामअयोध्यारोडट्रिप’ नावाने हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. या हॅशटॅगने अनेक यूजर्स रिट्वीट करत आहे. बहुतांश यूजर्सनी या पोस्टचे समर्थन केले आहे तर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. श्रीराम पायी नव्हे, पुष्पक विमानाने लंकेहून अयोध्येत परतले होते.

‘गूगल’वर हा रुट (मार्ग) श्रीलंकेतील डमबुल्लामधील चांदनाहून सुरु होतो. किंबिसा, गलकुलामा, मिहिंटाले, मेडवाछिया व्हाया तलाईमन्नारपर्यंत पोहोचतो. समुद्रमार्गे हा मार्ग रामेश्वरम् पोहोचतो. रामेश्वरम् हून कुंबोकोणम, कांचीपुरम, तिरूपती, नेल्लोर, ओंगले, सूर्यापेट पोहोचतो. महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूरमार्गे मध्यप्रदेशातील सिवनी, जबलपूर, कटणी, रीवा. नंतर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, सारोन, प्रतापगड, सुल्तानपूर, रेहटमार्गे अयोध्येत पोहोचतो.

प्रश्न-उत्तराची वेबसाइट ‘क्योरा’वर देखील या मुद्द्यावर २०१५ पासून चर्चा सुरु आहे. ‘दसर्‍यानंतर श्रीराम किती दिवसांत अयोध्यात परतले होते? हा प्रश्न ‘क्योरा’वर विचारण्यात आला होता. यावर अनेक लोकांनी आपापली मते नोंदवली आहेत. काहींनी फोटो तर काहींनी ग्राफिक्सच्या माध्यमातून टिप्पणी दिली आहे. काही लोकांनी तर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी दुसर्‍या वेबसाइट्सच्या लिंक देखील शेअर केल्या आहेत. आतापर्यंत ४१ हजार ४०० हून जास्त लोकांनी हे पेज पाहिले आहेत.

Leave a Comment