नवर्‍याला मारहाण करणार्‍या महिलात भारत तीन नंबरवर

husband
भारत व अन्य आशियाई देशात नवर्‍यांकडून बायकोला मारहाण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा आपला समज असेल तर युनायटेड नेशन्सने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल वाचणे आवश्यक आहे. नवर्‍याकडून बायकांना मारझोड, शिविगाळ होण्याचे प्रकार नेहमीचेच मानले जातात व त्याची वारंवार मिडीयातून चर्चाही होते. मात्र या सर्वेक्षणात असे दिसले आहे की बायकोकडून मारहाण, शिवीगाळीसारख्या हिंसक प्रकारांची शिकार होणार्‍यात पुरूषांचे प्रमाणही अधिक असून भारताचा या यादीत तिसरा नंबर लागतो.

या सर्वेक्षणात असेही नोंदले गेले आहे की बायका नवर्‍याला हाणताना हातांचा वापर कमी करतात. त्या स्वयंपाकघरातील लाटण्यांसारख्या वस्तू, बेल्ट, चपला, पिना, उशा यांचा वापर अधिक करतात व त्यामुळे नवर्‍यांना होणारी इजाही गंभीर असते. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत इस्लामिक देश इजिप्त पहिल्या स्थानावर आहे. तर ब्रिटन दोन नंबरवर आहे. अर्थात पुरूषांवर होत असलेले हे अत्याचार गंभीरपणे घेतले जात नाहीत असेही या सर्वेक्षणात नमूद केले गेले आहे. इजिप्तमध्ये महिलांकडून नवर्‍यांच्या होणार्‍या छळाचे प्रमाण ६६ टक्के असून येथे घटस्फोटासाठी अर्ज करणार्‍यांचे प्रमाणही लक्षणीय आहे.

Leave a Comment