एअरटेलची ऑफर वर्षाव सुरूच

airtel
मुंबई : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलीकॉम कंपन्या नवनवीन ऑफर्स देत आहेत. अनेक कंपन्यांना रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. एक नव्या ऑफरची एअरटेलने देखील आता घोषणा केली आहे. एअरटेलने ४जी मोबाईल हँडसेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर दिली आहे.

कोणताही ४ जी हॅंडसेटवर एअरटेल २५९ रूपयांच्या रिचार्जवर १० जीबी इंटरनेट डेटा देणार आहे. १ जीबी डाटा ग्राहकाला लगेच वापरता येणार आहे. तर बाकी ९ जीबी डाटा एअरटेल अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. २८ दिवसांची याची वैधता असणार आहे. सुरुवातीला ही ऑफर फक्त गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये लागू करण्यात आली होती पण आता ही ऑफर संपूर्ण भारतभर देण्यात आली आहे.

Leave a Comment