भारतातल्या या स्थळाला पाक रेंजर्स करतात सलाम

chamli
भारत पाकिस्तान सीमा भागात दोन्ही लष्करांत सतत कांही ना कांही कुरबुरी सुरू असतात. मात्र जम्मूपासून ४५ किमी अंतरावर असेलय्या सांबा जिल्ह्यात एक जागा अशी आहे की येथे भारत पाक सीमेची बंधने ढीली पडतात व येथे पाक रेंजर्स येऊन आवर्जून सलाम करतात.या स्थळाचे नांव आहे बाबा चमलियाल दर्गा. भारतातील नागरिक या स्थळावर वर्षभर दर्शनासाठी जात येत असतात मात्र पाकिस्तानातून येथे यात्रेच्या दिवसांतच पाक सैनिक येतात व बाबांसमोर लीन होऊन त्यांना चादर चढवितात. त्यामुळे हा दर्गा सांप्रदायिक सौहार्दाचे प्रतीक बनून राहिला आहे.

chamli1
फाळणीनंतरही गेल्या ६९ वर्षात या परंपरेत खंड पडलेला नाही.दरवर्षी हजारो भाविक येथे येत असतात. यात्रा काळात पाकिस्तानी रेंजर्स तिथल्या नागरिकांनी दिलेल्या चादरीही या दर्ग्यावर चढवितात व जाताना ट्रक टँकरमधून येथे असलेल्या विहीरीतील पाणी व येथील माती भरून नेतात. या पाण्याला सरबत तर मातीला साखर असे म्हणले जाते. यात्राकाळात भारत व पाकिस्तान दोन्ही कडेच रेंजर्स शांतीध्वज फडकावून झिरो लाईनवर उभे राहतात व एकमेकांना सॅल्यूट करतात तसेच बीएसएफ अधिकारी व पाक अधिकारी तळपत्या उन्हात उभे राहत एकमेकांची गळाभेटही घेतात. यापूर्वी पाक रेजंर्स त्यांच्या कुटुंबासह येथे येत असत पण आता परिस्थितीतील ताण वाढल्याने कुटुंबे आणली जात नाहीत.

असा समज आहे की या ठिकाणी असलेल्या विहीरीतील पाणी व येथील माती औषधी गुणधर्माची असून त्यामुळे जुने त्वचारोगही बरे होतात. ही मजार म्हणजे बाबा दीलिपसिंह मन्हास यांची समाधी आहे. बाबांनी त्यांच्या शिष्याचा त्वचारोग याच उपचारांनी बरा केला होता. तेव्हा बाबांची प्रसिद्धी वाढू लागली. तेव्हा गावातल्याच कुणीतरी बाबांचा शिरच्छेद केला. तेथेच ही समाधी बांधली गेली आहे. या समाधीसमोर दोन्ही देशातील लोक शांतता व सौहार्द नांदू दे अशी प्रार्थना करतात.

फाळणीच्या वेळी समाधीची जागा भारताच्या हद्दीत आली तेव्हा पाकिस्तानने या समाधीसमोरच सीमापार नवी समाधी बांधली मात्र यात्रेच्या काळात याच समाधीच्या दर्शनासाठी पाक रेंजर्स येतात. युवा व तरूण वर्गात भारत पाकची आंतरराष्ट्रीय सीमा पाहण्याच्या उद्देशाने येथे येणारे अनेक आहेत. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही येथे एकदा दुवा मागितली होती.

Leave a Comment