बजाज अलियान्झची सायबर कव्हर पॉलिसी

insuran
आजकाल बहुतेक सर्वच गोष्टींसाठी विमा उतरविता येतो त्यात आता सायबर कव्हर पॉलिसीचीही भर पडली आहे. वेगाने वाढत चाललेल्या सोशल मिडीयासाठी हा विमा उतरविता येणार आहे परिणामी आपली मते ठामपणे व्यक्त करणे युजर्सना शक्य होईल असे सांगितले जात आहे.

सोशल मिडीयावर व्यक्त होताना अनेकांना आपल्या सडेतोड अभिव्यक्तीमुळे कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल काय याची धास्ती वाटत असते. कारण आपण व्यक्त केलेल्या मतांमुळे कोण कधी बदनामी केल्याचा आरोप करेल व अब्रुनुकसानीचा दावा ठोकेल हे सांगणे अवघड असते. नव्या विमा कव्हरमुळे असा दावा केला गेलाच तर कंपनी थर्ड पार्टी जबाबदारी कव्हर करणार आहे. म्हणजे समजा आपल्याला कुणाला नुकसान भरपाई देण्याची वेळ आलीच तर ती रक्कम विमा कंपनी देणार आहे.

असेही समजते की सध्या सायबर क्षेत्रासाठी ५०० अॅक्टीव्ह सायबर कव्हर पॉलीसी उपलब्ध आहेत. हे मार्केट सध्या १ हजार कोटींचे असून येत्या तीन वर्षात त्याची वेगाने वाढ होईल असेही संकेत मिळत आहेत.

Leave a Comment