पाकिस्तानमध्ये ५ कोटी नागरिक मनोरुग्ण

pakistan
नवी दिल्ली – नेहमीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे तणावपूर्ण राहिले आहेत. शांतता राखण्यासाठी भारताने नेहमी प्रयत्न केले, मात्र पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देत भारतावर हल्ले करत राहिला आहे. याच पाकिस्तानसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताचा शेजारील देश पाकिस्तानची लोकसंख्या जास्त नाही, पण या लोकसंख्येपैकी एकूण ५ कोटी नागरिक हे मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, पाकिस्तानची एकूण लोकसंख्या जवळपास २० कोटी आहे आणि यापैकी ५ कोटी नागरिक हे मानसिक रोगी आहेत. यामध्ये तब्बल २ कोटी किशोरवयीन मुलांचा समावेश आहे तर दिड ते साडेतीन कोटी हे प्रौढांचा समावेश आहे.

एका सेमिनारमध्ये आगा खान युनिव्हर्सिटीमधील मानसोपचार विभागाच्या अध्यक्षा डॉ. आयशा मिया यांनी म्हटले की, पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्यापैकी १० टक्के म्हणजे २० कोटी मुलांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. १० ऑक्टोबर रोजी वर्ल्ड मेंटल हेल्थ डे दरम्यान आयोजित मेंटल हेल्थच्या सेशनमध्ये डॉ. आयशा मिया यांनी हे वक्तव्य केले आहे. आयशा यांनी पुढे म्हटले की, मानसिक आजाराने त्रस्त असलेल्यांसंदर्भात असे म्हटले जाते की हे लोक हिंसक होतात. हे लोक इतरांपेक्षा वेगळे दिसतात आणि ते समाजासाठी काहीही करत नाहीत. परिवारातील सदस्य, मित्र आणि समाजातील नागरिकांनी अशा लोकांची मदत करायला हवी ज्यामुळे ते लवकर बरे होतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment