दुर्गम भागातील रूग्णालयात प्रथमच ड्रोनमधून पोहोचतेय रक्त

dron
रवांडाच्या दुर्गम भागात जगात प्रथमच ड्रोनच्या मदतीने रक्त व अन्य आवश्यक सामग्री पोहोचविली जात असून अमेरिकी कंपनी झिपलाईन या स्टार्टअप कंपनीची मानवरहित ड्रोन याकामी वापरली जात आहेत. ही डोन फिक्स विंग असलेली व उपग्रह नेव्हिगेशनच्या मदतीने रस्त्याच्या तुलनेत अगदी कमी वेळात पहाडी भागात रूग्णांसाठी आवश्यक असलेले रक्त पुरवित आहेत. रक्ताची ही पाकेट बायोडिग्रेडेबल पॅराशूटच्या सहाय्याने रूग्णालयात पोहोचविली जात आहेत. त्यासाठी रवांडा आरोग्य विभागाने एअरड्राॅप्स तयार केले आहेत. हा प्रयोग यशस्वी होत असल्याने याच ड्रोनच्या मदतीने लसी व अन्य महत्त्वाची सामग्रीही या भागात पोहोचविण्याचा विचार केला जात आहे.

या ड्रोन सेवेमुळे रक्त मिळविण्यासाठी लागणारा कांही तासांचा वेळ कांही मिनिटांवर आला आहे. या कंपनीतील इंजिनिअर्सनी यापूर्वी स्पेस एक्सा, गुगल, लॉकहॉड व अन्य तंत्रज्ञान कंपन्यांतही काम केले आहे. प्रवासी विमानांशी टक्कर होऊ नये म्हणून ही ड्रोन ५०० फटांवरूनच उडविली जात आहेत. सध्या या ड्रोनची प्रवास क्षमता १५० किमी असली तरी ती ३०० किमी पर्यंत प्रवास करू शकतात असेही समजते.

Leave a Comment