एअरटेल देणार १४८ रूपयांत अनलिमिटेड कॉलींग

airtel
मुंबई: रिलायन्स जिओला काहीही झाले तरी टक्कर द्यायचीच आणि मार्केटमधील आपले वर्चस्वही कायम राखायचे असा टेलिकॉम कंपन्यांचा विचार असून रिलायन्सच्या स्पर्धक कंपन्यांमध्ये एअरटेल ही कंपनी यात आघाडीवर असून, नुकतीच एक नवी ऑफर एअरटेलने लॉंच केली आहे. या ऑफरनुसार केवळ १४८ रूपयांत ग्राहकाला अनलिमीटेड कॉलिंग करता येणार आहे.

पूर्ण एक महिना या ऑफरची वैधताही राहणार असून, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एअरटेलच्या प्रिपेड ग्राहकाला त्याच्या मोबाईलवरून *1221*1# हा क्रमांक डायल करावा लागणार आहे. हा नंबर डायल करताच तुमच्या मोबाईलच्या इनबॉक्समध्ये एक मेसेज येईल. त्यात काही तपशील असतील. जे काळजीपूर्वक वाचून तुम्हाला ही ऑफर सुरू करायची की नाही हे ठरवायचे आहे. तुम्हाला ही ऑफर सुरू करायची असेल तर, १ हा क्रमांक दाबून तुम्ही तुमचे कन्फर्मेशन कंपनीला कळवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एक मेसेज येईल. हा मेसेज वाचून येथेही तुम्हाला १ हाच क्रमांक दाबून रिप्लाय करायचा आहे. इतकी प्रक्रीया पूर्ण केल्यावर तुमच्या बॅलन्समधून १४८ रूपये वजा होतील. हा बॅलन्स वजा झाला की लगेच तुमची ऑफर सुरू होईल. या ऑफरचा लाभ तुम्हाला पूर्ण एक महिना घेता येऊ शकेल.

दरम्यान, ही ऑफर सुरू करण्यासाठी एक अट आहे. ती म्हणजे, ही ऑफर सुरू करण्यापूर्वी तुमच्या मोबाईल अकाऊंटमध्ये १४८ रूपयांचा बॅलन्स असणे आवश्यक आहे. तुमच्या खात्यात जर तेवढा बॅलन्स नसेल तर, तुम्हाला ही ऑफर सुरू करता येणार नाही. या ऑफरच्या अधिक माहितीसाठी तुम्ही एअरटेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा तुमच्या नजीकच्या एअरटेलच्या ऑफिसला जाऊन प्रत्यक्ष भेट देऊ शकता. जेथे तुम्हाला अधिक सविस्तर माहिती मिळू शकेल.

Leave a Comment