चीनी मालविक्रीत बहिष्कारामुळे ५० टक्के घट

chinese
चीनी मालावर बहिष्कार घालण्यासाठी देशभरात सोशल मिडीयाच्या सहाय्याने सुरू झालेल्या अभियानाचे परिणाम जाणवू लागले असून गेल्या कांही दिवसांत चीनी मालच्या विक्रीत ५० ते ६० टक्के घट झाल्याचे दिल्लीतील इलेक्ट्राॅनिक्सचा आशियातील सर्वात मोठा बाजार मानल्या जाणार्‍या भगीरथ पॅलेस या बाजारपेठेतील व्यवसायिकांकडून समजते. या व्यापार्यगयां त्यामुळे जुन्या ऑर्डर रद्द केल्या आहेतच पण नवीन ऑर्डर नोंदविलेल्याच नाहीत.

दिवाळीच्या तोंडावर भारतात चिनी मालाची विक्री शिगेला पोहोचलेली असते. गतवर्षी याच दिवसात दिवाळीसाठी मागविलेला सर्व माल विकला गेला होता. यंदा मात्र मागविलेल्या मालातील ६० टक्कयांहून अधिक माल शिल्लक आहे. दिल्लीच्या या मार्केटमध्ये ८ ते १० कोटींचा माला पडून राहिला असल्याचे व या मालात पैसा गुंतल्याने व्यापारी अडचणीत आल्याचे सांगितले जात आहे. ग्राहक स्वदेशी मालाला प्राधान्य देत आहेत व महाग असला तरी आवर्जून याच मालाची मागणी करत आहेत असे व्यापारी सांगतात. संपूर्ण बाजारपेठेत चिनी माल विरोधी माहोल असल्याचे बल्ब, इलेक्ट्राॅनिक्स गॅजेट विकणारे व्यापारी सांगत आहेत.

Leave a Comment