सन्स ऑफ देवकी, सरेाज अॅन्ड सुजाता

nayee-soch
बातमीचे हेडिंग वाचून काही बोध झाला नाही का? स्टार प्लस ने सुरू केलेल्या नई सोच या अभियानाचा हा एक भाग आहे. व त्याच्याशी भारताच्या वनडे क्रिकेटचा कप्तान महेंद्रसिंग धोनी, कसोटी कप्तान विराट कोहली व स्टार प्लेअर अजिंक्य रहाणे यांची लिंक जुळलेली आहे. स्टार प्लसने छेडलेल्या नई सोच या अभियानाचा मुख्य उद्देशच महिला पुरूषांना समाजात सारखाच सन्मान मिळावा व विविध परंपरा व रूढींमुळे महिलांना समाजात जे दुय्यम स्थान आहे त्याबाबत जागृती करण्याचा आहे. या अभियानाशी धोनी, विराट व रहाणे जोडले गेले आहेत.

या संदर्भातल्या तीन जाहिराती स्टार प्लसने सादर केल्या आहेत. त्यात या तिघांच्याही जर्सीवर त्यांच्या आईचे नांव लिहिले गेले आहे. धोनीला या संदर्भात पत्रकारांनी विचारल्यावर त्याने आजपर्यंत मी वडिलांचे नांव लावले तेव्हा काय विशेष असे मला कुणी विचारले नव्हते मग आईचे नांव लिहिल्यावर का विचारता असा उलट प्रश्न केला आहे तर विराटने माझी ओळख आजपर्यंत कोहली अशी होती ती तितकीच सरोज अशीही आहे असे सांगितले. रहाणे म्हणाला मला क्रिकेट प्रक्टीससाठी नेताना आई माझी बॅग व लहान भावाला कडेवर घेऊन पोहोचवित असे. तेव्हा क्रिकेट खेळून वडिलांचे नांव रोशन कर असे सांगितले जात होते मात्र आईचे नांव रोशन करणेही माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. अर्थात या तिघांच्याही करियरमध्ये त्यांच्या आईचे योगदान मोठे आहे यात शंका नाही.

Leave a Comment